प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या कडून महाराष्ट्र विकास सेना पार्टीचे प्रमुख तथा राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांना दिवाळीच्या शुभेच्छा;

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्याकडून महाराष्ट्र विकास सेना पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष किरण साठे यांना दिवाळीच्या शुभेच्छा; ‘विकसित भारत’ घडवण्याचे आवाहनविशेष प्रतिनिधी:देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांना अधिकृत ई-मेलद्वारे पत्र पाठवून दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या ‘संपर्क’ (no-reply@sampark.gov.in) यंत्रणेद्वारे थेट पाठवण्यात आलेल्या या विशेष संदेशात त्यांनी किरण साठे यांच्यासह सर्व देशवासीयांना उज्ज्वल भविष्यासाठी आणि समृद्ध भारताच्या उभारणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.पंतप्रधानांनी आपल्या पत्रात दिवाळी सणाचे महत्त्व अधोरेखित करताना लिहिले आहे की, हा सण अंधारावर प्रकाशाचा, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीचा आणि निराशेवर आशेचा कायमस्वरूपी विजय साजरा करतो. दिवाळीच्या या पवित्र पावन पर्वावर आपल्या समृद्ध परंपरांचे जतन करणे आणि परस्परांमधील एकतेचे व सलोख्याचे बंध अधिक दृढ करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे सदिच्छा व्यक्त करताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे की, ही दिवाळी प्रत्येक घरात सुख, शांती, समृद्धी आणि सौहार्द घेऊन येणारी ठरो. या उत्सवाच्या काळात सर्वांनी दयाभावाचा प्रसार करावा, सकारात्मकता स्वीकारावी आणि देशाच्या एका उज्ज्वल भविष्यासाठी एकत्रितपणे कार्य करावे, अशी प्रेरणा या सणातून मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.पत्राच्या शेवटी, पंतप्रधानांनी एका महत्त्वाच्या राष्ट्रीय संकल्पनेवर विशेष भर दिला आहे. एका नव्या ऊर्जेसह आणि दृढ संकल्पाने ‘समृद्ध आणि विकसित भारत’ घडवण्यासाठी आपण सर्वांनी मिळून पुढे जावे, असे आवाहन त्यांनी किरण साठे यांना पाठवलेल्या या शुभेच्छा पत्रात केले आहे. पंतप्रधानांच्या या थेट शुभेच्छा संदेशामुळे राजकीय वर्तुळात आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

